Wednesday, June 22, 2016

मरतुकडी गाय

👍शेवटपर्यंत नक्की वाचा👉

🌹मरतुकडी गाय🐮

चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. ‘तुमचे कसे भागते?’ गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. आमचे कसेतरी भागते.’

गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका!’ गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जिवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दय व निष्ठूर आहेत. कोणी शिष्य गाय मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरुंनी स्वतःच करायचे ठरवले. ‘बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे?’ त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरु त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या गाईला टेकडीवरून खाली ढकलले व गाय मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.

त्यांच्या बरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार ‘गिल्टी फिलिंग’ येऊ लागले. गुरुंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपण पण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पहाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.

तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. झोपडीच्या जागी एक आधूनीक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनीक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेते पण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्यांने तिथल्या एका माणसाला विचारले, ‘मा॑फ करा! मी कांही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?’

‘तुमचे म्हणणे बरोबर आहे!’ त्या माणसाने उत्तर दिले. ‘त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात रहातात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे फंक्शन आहे.’

आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहीले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरूण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरुंबरोबर येथे आलो होतो. त्यावेळी तुम्ही एका मोडक्या, जिर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर रहात होतात. तुमच्याकडे एक हडकूळी गाय पण होती.’

‘अगदी बरोबर आहे.’ तो चिनी माणूस उत्तरला ‘एका रात्री आमची गाय टेकडीवरून खाली पडली व मेली. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे हा प्रश्न उभा राहीला. कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळू हळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरवात केली, उद्योग व्यवसायात पदार्पण केले. हे तीन तरूण ही माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमची गाय मेली नसती तर हे घडले नसते!’

आता त्या शिष्याला कळले की गुरु गाय मारयला का सांगत होते. त्याला आपल्या गुरुंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरुविषयींचा आदर कित्येक पटीने वाढला.

अनेक मराठी माणसांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला ‘नोकरी’ असे म्हणतात. मराठी माणसांची नजर या अशा गायीवरच असते. या गाइचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशीबात धष्टपुष्ट गाय येते तर कांहीना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशीबात अशी गायच नसते.

मराठी माणसाचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नेकरीच मिळत नाही त्याला ‘कंडेम’ समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ‘माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला’ हे एखाद्या गृहीनीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगीतले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो. पण किती झाले तरी ‘नोकरी’ ही एक मरतुकडी गायच असते, कारण ही गाय पुरेसे दूध कधीच देत नसते.

अशीच अजुन एक गाय असते ज्याला ‘जर्सी’ गाय म्हणतात. ही गाय भरपूर दूध देत असते पण ही गाय नेकरीवाल्यांच्या नशीबी नसते तर फक्त ‘उद्योग, धंदा, व्यवसाय’ करणार्याह माणसांच्या नशीबी असते. पण मराठी समाजात या गाईला कोणी फारसे महत्व देत नसते. ‘माझ्या नवर्याेचा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला.’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोलले पण जात नाही व ऐकले पण जात नाही. ‘माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत.’ हे वाक्य ज्या अभीमानाने मुलाकडून सांगीतले जाते त्याच अभीमानाने ‘माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे’ हे वाक्य सांगीतले जात नाही. लग्न करणार्याा मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात. मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणाऱ्या मुलाला हुंड्यासकट मुलगी मिळते. पण वर्षाला 50 लाख रुपये इन्कम असलेल्या पण धंदा करणार्याा मराठी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.

‘नोकरी’ च्या मरतुकड्या गाईवर जगायचे का उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची का दोन्ही गायी संभाळायच्या हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही कां?

तुम्हाला काय वाटते?

Saturday, April 30, 2016

life_जगायची

🎸 life_जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.
कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;
पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!

 "जगाला काय आवडतं ते करु  नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड," बनेल. .!!!

Beautiful Msg

👌👌Beautiful Msg 👌👌

कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... 👌👌

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... 👌👌

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... 👌👌

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... 👌👌

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... 👌👌

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... 👌👌

हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... 👌👌

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री...👌👌

स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव....👌👌

मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण.....👌👌

"🌹माझं" म्हणून नाही.
''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...
'जग कसही आसू द्या.  फक्त .........''चांगले वागता'' आलं पाहिजे..!!🌹      
      🍂😊  😊 🍂
🍁सुंदर दिवसाच्या 🍁

Monday, April 25, 2016

जाती

भारतात
इंग्रज आले ,
फक्त
१७९

 नंतर
१००० झाले ,

 नंतर
१०,०००

आणि

 नंतर
१,००,००० झाले

 आणि

या एक लाख इंग्रजांनी आपल्या
३० करोड
 जनतेवर राज्य केले.

कसे बर शक्य झाले ???

 कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
 त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास
 केला होता
 आणि
त्यांनी एक निष्कर्ष
 काढला जो आजही 2015 सालीही लागू होतो ,

 तो म्हणजे भारतीय लोकांना

 जाती-भेद,
 धर्मभेद,
 गरीब-श्रीमंत,
 प्रांत भेद
 या गोष्टीनमध्ये
 पेटवायचे मग हे

 ३० काय ३०० करोड
जरी झाले तर
 कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत ...

कारण....

 ते एकमेकांनाच कापत बसतील
पण कधीही एक होऊ
 शकणार नाहीत .

 एवढा द्वेष मनामध्ये भरेल.

 मी मराठा
 मी धनगर
 मी चांभार
 मी कुंभार
मी मांग
 मी महार
 मी ब्राम्हण
 मी माळी
 मी आमुक आणि मी तमुक .....

 .... झालं यातच
 आम्ही
आमचे श्रेष्ठत्व मानतो.

 ( मीञांनो ६७४२ जाती आहेत)

 आज आम्ही एवढे मोठे झालो आहे
की....
..... थोर युग
 पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही..

 छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे,

मुहम्मद पैगम्बर मुसलमानांचे झाले,

महर्षि वाल्मिकी कोळ्यांचे,

 सावरकर ब्राह्मणांचे झाले,

बाबासाहेब आंबेडकर दलितांचे ,

 मल्हारराव होळकर धनगारांचे,

महात्मा ज्योतीराव फुले माळ्याचे,

आणाभाऊ साठे मातंगाचे ..

 जाता जात नाही ती जात

 इंग्रजांनी केली वाताहत।

 आपण बनवले गेलो हातोहात,

आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।

 पटत असेल तर आचरणात आणा नाहितर आजही कोणाचेतरी गुलाम बनुन जगा ॥

पटलं तर इतरांना जरुर पाठवा 🙏

Tuesday, April 19, 2016

पत्र

"बाळा...
तू शाळेत जायचास …. तेव्हा मास्तरांनी पत्र लिहायला शिकीवले असल ना?"

"हो बाबा… सांगा कुणाला लिहायचे आहे पत्र ?"

प्रधानमंत्री असतात ना, त्यांना लीहायचे हाय… लेका, पोटासाठी... शेतीसाठी कर्ज मागायचे हाय…. लिहशील?"

"नक्कीच लिहितो…"

आणि मग १२ वर्षांचा छोटा  पत्र लिहू लागला....
***************
"…
माननीय

सरकार

विषय : इतक्या कमी शब्दात विषय मांडू शकत नाही, त्यामुळे
विषय वाचून पत्र फेकण्यापेक्षा पूर्ण पत्र वाचावे , ही विनंती.

पत्र लिहिण्यास कारण की....
मी तसा बरा आहे ...

यंदा आपल्या कृपेने आत्महत्या कमी झाल्यात ..
(जास्त जण उरलेच नाहीत आत्महत्या करायला... आम्ही मोजके भित्रे बाकी आहोत फक्त ).

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही माझ्या मुलाला कपडे, पुस्तक, खेळणी तर नाही... पण त्याला एक वेळेचे अर्धवट जेवण देण्याइतपत हिरवेगार "दु:ख" माझ्या शेतात उगवले आहे ...

पाऊस कमी झाला यात तुमची काहीच चूक नाही ... घामाने जितके पिकवता आले तेवढे पिकवले ...

उधार मागायला सावकाराकडे जावू शकत नाही ..
कारण पोरगी आणि बायको सोडून गहाण ठेवण्यासारखे आता काहीच उरले नाहीय...
माझ्या पोरीला माझा सदरा दिल्यामुळे ती सध्या आनंदात तर म्हणता येणार नाही, पण खुश आहे. कारण तिचे अंग ती आता झाकू शकते...

बायको माझी अगदी शांत आहे ..
एकही शब्द बोलत नाही .. बसल्या बसल्या कधी उगीच रडून देते बस...

तरी तुमचे मंत्री दुष्काळ असतांना सुध्दा दुप्पटीने श्रीमंत झालेत. त्यांच्या अमाप संपत्तीतून आम्हाला काही उधार द्यावे ही विनंती ...

आमचेच लचके तोडून जमवलेली ती संपत्ती आहे हे सुद्धा ध्यानात घेतलेत तर तुम्हा मायबाप सरकारचे भले होईल .......
तस दुष्काळाकडे लक्ष द्यायला आपण देशात असतातच कोठे.. अमेरिका, जपानचे हायफाय शेतकरी पाहून आपले शेतकरी असेच असतील असे वाटत असेल.......

आपला,
...................."

********************

"बाबा... अजून काही लिहायचं आहे ..?"

मी पोराकडे बघत होतो .. त्यानेच हे पत्र लिहिले होते...
मी मोजक्या शब्दात सांगितले होते की काय लिहायचे आहे.... तो पत्र वाचत होता तेंव्हा डोळ्यात पाणी आलेले ..
स्वताचा रागही आलेला ..आणि थोडे बरे ही वाटले की पोरगा हुशार आहे ...
मी त्याला जवळ घेतलं ..
माझी "तनु" पण आली माझ्याजवळ.... म्हणाली "बाबा, मीच शिकवले आहे त्याला .. फी भरली नाही म्हणून आम्हाला शाळेत बसू देत नाही ना ..तर मी त्याला आता घरीच शिकवते ..."

मी तिला ही जवळ घेतले ... बायको भरल्या डोळ्याने अश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत होती ...

तिच्यासाठी... मुलांसाठी जगेन... च्या आयला ...
त्यांना पाहिले की एक विश्वास येतो मनात ....
मी म्हंटले "bala, अजून एक वाक्य टाक पत्रात शेवटी..."

तो बोलला: "सांगा बाबा .."

म्हंटले : "लिह... मी भ्याड नाहीय… शेतकरी असलो तरी अंगात हिम्मत आहे... मी लढेन गरिबीशी... शेवटच्या श्वासापर्यंत..."

हे एकून मी सुद्धा कधीतरी आत्महत्या करेन अशी सदैव भीती असलेली माझी बायको सुखावली थोडी .... आणि ओरडली....
"पुरे झाले आता... काम करत नाही काय नाही .. ये तनु गिळायला वाढ त्यांना ...."

....आणि आडोश्याला जाउन ढसा ढसा रडू लागली..

>>
आज व्हाट्सअप वर आलेला हा एक संदेश मनाला चटका देऊन गेला.......
आजपर्यत आपण बरंच काही शेअर करत आलो
हे पत्र एवढे शेअर करा की प्रधान मंत्रींना  पोहोचले पाहीजे
आपण ज्यांच्या मेहनतीवर जगत आहोत त्यांच्यासाठी...
खरे शेतकरी असल तर Forward करा
😔😔😔😔😌😔😔😔...

शुभ सकाळ

🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आत्मविश्वासाने केलेल्या
 . . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
 . .  . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
 . . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
 . . . .  जो उत्तीर्ण होतो तो
 जिवनात यशस्वी होतोच..!!
🙏शुभ सकाळ🙏

Friday, April 15, 2016

डॉ बाबासाहेब आंबेडकर

The legend......

डॉ बाबासाहेब आंबेडकर

√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव yसत्याग्रही....

√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...

√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...

√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....

√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....

√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...

√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....

√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....

√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...

√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...

√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...

√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...

√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...

√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....

√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....

√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....

√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....

√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....

√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...

√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....

√ जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मातर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी....तेव्हा केवळ ३ दिवसात ८,५०,००० लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....

√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}

√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....

√ 'RajGruha' या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी.
 डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट-

वेळ आणि पैसा वाचवा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम
सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ .बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी असायचे . सकाळी ७:०० ते रात्री ८: ०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत . दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि, पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत .

एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन
सोडून दिले .रात्री आठ वाजता ब्रिटीश ग्रंथालायामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर परत जेवणखाणा म्हणून तासभर विश्रांती घेत. आणि पुन्हा अभ्यासाला बसत . मग उत्तररात्र उलटून पहाटवारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री ( तल्लीनता ) भंग होत नसे. रूमवर त्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी राहायचा .त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे .एकदा असाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला . त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले . त्याने घड्याळाकडे बघितले . रात्रीचे तीन वाजत होते . तो म्हणाला , मिस्टर आंबेडकर हि काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे का ? अहो, करायलाही काही मर्यादा असते . अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल .ह्यावर बाबासाहेब क्षणभर
पुस्तक बाजूला करीत म्हणाले, त्याला म्हणाले  मी इथे
शिक्षणासाठी आलोय खरा,पण माझा जीव भारतातच घुटमळलाय . तेथे माझे करोडो बांधव धर्म अन रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून वंचित झालेत. कुत्र्यापेक्षाही लाचार अन हीन दिन जीवन ते जगत
आहेत. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे .

आज माझ्याजवळ वाया घालवायला वेळ अन पैसा नाही रे असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तकात डोळे
खुपसले .तो नुसता बघत राहिला.!The legend......

खुपसले .तो नुसता बघत राहिला.!